लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर अफवा


गेल्या काही दिवसांपासून गानकोकिळा लता मंगेशकर या अस्वस्थतेमुळे रूग्णालयात दाखल होत्या. लता मंगेशकर यांची तब्येत ठीक नाही, पण त्यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा झाली आहे. एकीकडे प्रत्येकजण सोशल मीडियावर लता दीदींच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत असताना दुसरीकडे काही लोकांनी त्यांच्या मृत्यूची अफवा पसरवण्यास सुरुवात देखील केली आहे.

वास्तविक असे अनेक संदेश ट्विटर- फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहेत, ज्यात लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल बोलले जात आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत. लता मंगेशकर अद्याप रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी लता मंगेशकर यांच्या टीमकडून निवेदन देण्यात आले की त्यांची तब्येतीत आधीपेक्षा सुधारणा होत आहे.

विशेष म्हणजे 90 वर्षीय गायिका लता मंगेशकर यांना गेल्या सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले. जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्याबाबतच्या बनावट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे लक्षात घेता लता मंगेशकर यांच्या मीडिया टीमने त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आणि लोकांना अशी अफवा पसरवू नयेत अशी विनंती केली. लता मंगेशकर यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले की त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

लता मंगेशकरांवर उपचार करत असलेले डॉ. प्रितित समदानी म्हणाले होते की, लताजी सध्या न्यूमोनिया, हृदयविकाराचा त्रास आणि छातीत संसर्गातून ग्रस्त आहेत. आम्ही त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की त्या लवकरच बऱ्या होतील.

Leave a Comment