शाओमीचा वॉर्म कप गरम चहा सोबतच मोबाईल करणार करणार चार्ज


नवी दिल्ली: दर काही दिवसांनी नवनवी उत्पादने चीनची आघाडीची टेक कंपनी शाओमी बाजारपेठेत आणत असते. आता आपल्या ग्राहकांसाठी एक आगळावेगळा कप शाओमीने आणला आहे. वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाने युक्त असा हा कप चहा गरम करण्यासोबतच मोबाइल देखील चार्ज करणार आहे. या उत्पादनाला शाओमीने ‘वॉर्म कप’ असे नाव दिले आहे.

या ‘वॉर्म कप’ची कोणत्याही प्रकारच्या वातावरणात ५५ डिग्रीपर्यंत तापमान राखण्याची क्षमता असून हे सर्व वायरलेस चार्जिंगद्वारे शक्य होते. चहा किंवा कॉफी गरम ठेवण्यासाठी ग्राहकांना हा कप वायरलेस चार्जिंग पॅडवर ठेवावा लागतो. पारंपरिक चार्जरपेक्षा हा कप पूर्ण वेगळा आणि अद्ययावत असून अधिक सुरक्षित देखील आहे.

प्रत्येकाच्या घरात असलेल्या सिरामिक कपासारखाच ‘वॉर्म कप’ हा असतो. वॉटरप्रूफ असल्यामुळे खराब झाल्यानंतर हा कप धुवून स्वच्छ करता येतो. चार्जिंगची ‘वॉर्म कप’मध्ये रचना अत्यंत विचारपूर्वक व बारकाईने करण्यात आल्याने ग्राहकांना यापासून कोणताही धोका नसतो. याचे तापमान चार तास वापर न केल्यास वाढण्याची प्रक्रिया आपोआप बंद होते आणि कप ‘स्लीप मोड’मध्ये जातो.

हा ‘वॉर्म कप’ चहा किंवा कॉफी गरम ठेवण्यासोबतच स्मार्टफोनही चार्ज करू शकतो. त्यासाठी त्यासोबत येणाऱ्या चार्जिंग पॅडचा वापर करावा लागतो. १० वॅटचा हा पॅड असतो. त्यासाठी वायरलेस चार्जिंग फिचर तुमच्या फोनमध्ये असणे गरजेचे आहे. सध्या फक्त चीनच्या बाजारात ‘वॉर्म कप’ उपलब्ध असून २ हजार रुपये त्याची किंमत आहे.

Leave a Comment