सोशल मीडियावर सुरू #ओवैसी_भारत_छोड़ो ट्रेंड


नवी दिल्ली – अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी असमाधान व्यक्त केल्यामुळे असदुद्दीन ओवेसी विरोधात सध्या सोशल मीडियावर #ओवैसी_भारत_छोड़ो हा ट्रेंड सुरू आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेकांनी ओवेसी यांना ट्रोल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर भारत सोडून जा, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी ओवेसी यांना सुनावले आहे.

दरम्यान, मशिदीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 5 एकर जमिनीची ऑफर नाकारली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केल्यानंतर पुन्हा ट्विट करत ओवेसींनी ‘मला माझी मशीद पुन्हा हवी असल्याचे म्हटले होते. पण, या ट्विटनंतर ओवेसींना नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ट्विटरवर आज सकाळपासून #ओवैसी_भारत_छोड़ो हा हॅशटॅग 18 हजारपेक्षा जास्त वेळा वापरण्यात आला आहे.

9 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद वादग्रस्त जमिनीप्रकरणी अंतिम निर्णय जाहीर केला होता. 40 दिवसांत वर्षानुवर्ष सुरु असलेल्या या प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद करण्यात आले. तर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखीलाल पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणी ऐतिहासिक सुनावणी करत अंतिम निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार, वादग्रस्त भाग रामलल्लांचा तर मशिदीसाठी अयोद्धेत 5 एकर जागा दिली जाणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

Leave a Comment