ट्विटरवर का ट्रेंड होत आहे #धरतीआबा_बिरसामुंडा

ट्विटरवर आज सकाळपासून #धरतीआबा_बिरसामुंडा हे ट्विटरवर ट्रेंडिग होत आहे. लाखो लोकांनी हे हॅशटॅग वापरून ट्विट केले आहे. त्यामुळे प्रश्न असा पडतो की, हे बिरसा मुंडा नक्की आहेत तरी कोण ? सोप्या भाषेत सांगायचे तर बिरसा मुंडा हे क्रांतीकारी होते. त्यांनी आदिवासींवर इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला होता. केवळ वयाच्या 25 व्या वर्षी रांची कारागृहात त्यांच्या रहस्मयीरित्या मृत्यू झाला.

15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 1875 ला झारखंडच्या रांची येथे झाला होता. बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरोधात स्वतंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सकला येथून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते जर्मन मिशनरी शाळेत शिक्षणासाठी गेले. त्यांनी ख्रिश्चानिटी धर्म स्विकारला, मात्र नंतर त्यांना शाळा सोडली. याचे मुख्य कारण होते की, तेथे आदिवासींच्या संस्कृतीची खिल्ली उडवली जात होते. बिरसा मुंडा यानंतर स्वामी आनंद पांडे यांच्याशी जोडले गेले.

वर्ष 1895 मध्ये काही अशा घटना घडल्या की, लोक त्यांना देव मानू लागले. लोकांना वाटायचे की, त्यांच्या स्पर्शामुळे आजार दूर होतात. लोकांवर त्यांचा प्रभाव वाढू लागला. त्यांच्या अवतीभोवती गर्दी जमा होऊ लागली. मात्र बिरसा यांनी लोकांना अंधविश्वासापासून लांब नेत हिंसा आणि मादक पदार्थांपासून लांब राहण्यास सांगितले. त्यांच्या प्रभावामुळे आदिवासींनी ख्रिश्चन धर्म स्विकारणे थांबवले. ज्यांनी धर्म स्विकारला होता, ते पुन्हा आपल्या धर्मात परतले.

बिरसा मुंडा यांनी इंग्रजांद्वारे अदिवासींची जमीन हडपण्याला विरोध केला होता. इंग्रजांच्या भारतीय जंगल कायदा-1882 चा त्यांनी विरोध केला. त्यांना लोकांना अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यास प्रेरित केले. 1895 मध्ये त्यांना सर्वात प्रथम जेल झाली. ते 2 वर्ष जेलमध्ये होते. मात्र नंतर त्यांना सोडण्यात आले.

24 डिसेंबर 1899 ला लोकांनी पोलिस स्टेशनला आग लावण्यास सुरूवात केली. समोर गोळ्या सुरू होत्या मात्र बिरसा मुंडा आणि त्याचे सहकारी हातात धनुष्य आणि बाण घेऊन लढत होते. बिरसा मुंडा यांना यावेळी पुन्हा अटक करण्यात आले

जानेवारी 1900 मध्ये डोमबाडी पर्वतांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाला. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुले मारली गेली. बिरसा तेथे एक सभेला संबोधित करत होते. अनेक लोकांना अटक करण्यात आले. 3 मार्च 1900 ला बिरसा यांना चक्रधरपुर येथे अटक करण्याल आले. 9 जून 1900 ला रांची जेलमध्ये रहस्मयीरित्या त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा ते केवळ 25 वर्षांचे होते. आजही बिहार, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये त्यांना देवासमान पुजले जाते.

Leave a Comment