बीएसएनएलच्या 75 हजार कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती


नवी दिल्ली – आतापर्यंत भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) तब्बल 75 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) स्वीकारली आहे. यासंदर्भातील माहिती कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांनी दिली आहे.

सध्या जवळपास एक लाख कर्मचारी कंपनीच्या व्हीआरएस योजनेसाठी पात्र आहेत. तर, दीड लाखाच्या घरात कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कंपनीने सध्या ७७ हजार कर्मचाऱ्यांनी या पर्यायाची निवड करावी, असे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या योजनेनुसार, व्हीआरएस घेण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२० निर्धारित करण्यात आली आहे.

स्‍वेच्छा निवृत्ती योजना (वीआरएस) कर्मचाऱ्यांची संख्‍या कंपन्यांकडून तातडीने मोठी प्रमाणात कमी करायची असल्यास हे तंत्र वापरले जाते. याचा वापर जास्तीचे मनुष्यबळ कमी करण्यासाठी आणि कामगिरी सुधारण्यासाठी केला जातो. ‘गोल्‍डन हॅन्डशेक’ही या योजनेला म्हटले जाते. बीएसएनलची सध्याची व्हीआरएस योजना-2019 मध्ये 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास वेतनावर होणार खर्च कमी होऊन सात हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

Leave a Comment