‘भुलभुलैय्या’च्या सिक्वेलमध्ये तब्बूची एंट्री


२००७ साली आलेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या ‘भुलभुलैय्या’ या सुपरहिट चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार आता सीक्वेल बनवणार आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री कियारी अडवाणी स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटात आता आणखी एका अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे.

ही माहिती खुद्द कियाराने ट्विट करत दिली आहे. तब्बूचा फोटो शेअर करत मी तब्बूसोबत भुलभुलैय्या चित्रपटाचे शूट करण्यासाठी फार उत्सुक असल्याचे कॅप्शन कियाराने दिले आहे. ‘भुलभुलैय्या’मधील तब्बूची एण्ट्री हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.

मुळात २००५चा तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला ‘भुलभुलैय्या’ हा रिमेक होता. १९९३ च्या ‘मणीचित्रथाझु’ या मल्याळम चित्रपटाचा चंद्रमुखी हा चित्रपटदेखील रिमेक होता. ‘भुलभुलैय्या’ अक्षय कुमार, विद्या बालन आणि शाइनी अहुजा यांच्या अभिनयामुळे आणि चित्रपटातील गाण्यांमुळे सुपरहिट ठरला होता. आता चाहत्यांना ‘भुलभुलैय्या’च्या सिक्वेलसाठी उत्सुक आहेत.

Leave a Comment