नवीन वर्षात भारतात दाखल होणार एमजी मोटरची इलेक्ट्रिक कार

एमजी हेक्टरच्या यशानंतर आता एमजी मोटर भारतात नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एक इलेक्ट्रिक्ल कार असून, ZS EV या नावाने ही कार भारतात लाँच करण्यात येणार आगे. कंपनी डिसेंबरमध्ये या कारवरील पडदा हटवण्याची शक्यता. तसेच 5 डिसेंबरपासून या कारची प्री-बुकिंग सुरू होणार आहे. तर जानेवारी 2020 ला भारतात ही इलेक्ट्रिकल कार लाँच केली जाणार आहे.  सुरूवातीच्या टप्प्यात कंपनी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबाद या 5 शहरात कारला लाँच करणार आहे.

(Source)

या कारमध्ये 44.5 kWh बॅटरी मिळेल, जी सिंगल चार्जमध्ये 300 किमी अंतर पार करेल. याशिवाय 50 kW DC चार्जरसोबत 40 मिनिटात कार 80 टक्के चार्ज होईल. तर 7 kW चार्जरने फूल चार्जसाठी 7 तास लागतील.

(source)

एमचीच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेंमेट सिस्टम मिळेल. याशिवाय प्लॅट-बॉटम्ड स्टिअरिंग व्हिल, यूएसबी मोबाईल चार्जिंग फंक्शन, ब्लूटूथ, रिअर व्ह्यू पार्किंग कॅमेरा सारखे फीचर्स असतील. याशिवाय अपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटोसोबत पॅनोरॉमिक सनप्रुफ देखील असेल. तसेच, झेडएस इलेक्ट्रिक कारचे पुढील डिझाईन देखील शानदार आहे.

Leave a Comment