ना रूफ… ना विंडशिल्ड, तरीही या सुपरकारची किंमत आहे 12 कोटी रुपये

ब्रिटिश कार कंपनी मॅक्लॉरेने सुपरकार एल्वा रोडस्टर सादर केली आहे. या सुपरकारचे वैशिष्ट्य म्हणजे यात रूफ (छप्पर) आणि विंडशिल्डच नाहीये. या गाडीची किंमत 17 लाख डॉलर (जवळपास 12 कोटी रुपये) आहे. एवढी किंमत देऊन देखील गाडीसाठी साउंड सिस्टम वेगळे खरेदी करावे लागेल.

बाजारात या आधी देखील अनेक कन्वर्टिबल कार आहेत. म्हणजेच गरजेनुसार, गाडीचे रूफ काढले जाऊ शकते अथवा लावले जाऊ शकते. मात्र या गाडीत रूफचा पर्यायच देण्यात आलेला नाही.

(Source)

प्रश्न असा आहे की, जर ड्रायव्हरसमोर विंडशिल्डच नसेल तर गाडी चालवताना हवेमुळे अडचण होऊ शकते. यामुळे ड्रायव्हिंग करताना त्रास होईल. मात्र कंपनीने एअरमॅनेजमेंट सिस्टमद्वारे ही समस्या सोडवली आहे. कारने ताशी 40 किमीचा स्पीड पकडताच ही सिस्टम सुरू होईल. यामुळे ड्रायव्हरसमोर हवेची एक न दिसणारी भिंत तयार होईल, जी बाहेरून येणारी हवा ड्रायव्हरपर्यंत पोहचणार नाही. एक छोटेसे कार्बन फायबर विंड रिप्लेक्टर देखील गाडीच्या समोर आपोआप थोडे वरती येईल व हवेला गाडीतील लोकांपर्यंत पोहचण्यापासून रोखेल.

(Source)

जर एखाद्या ग्राहकाला या गाडीत विंडशिल्ड लावायची असेल तर यासाठी देखील कंपनीने पर्याय दिला आहे. मात्र यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

(Source)

या कारमध्ये 804 हॉर्स पॉवरचे टर्बोचार्ज्ड व्ही8 इंजिन देण्यात आलेले आहे. कंपनीने सांगितले आहे की, एल्वा रोडस्टर या सुपरकार मॉडेलच्या केवळ 399 कारचे प्रोडक्शन करण्यात आलेले आहे. 2020 च्या अखेरपर्यंत पहिल्या कारची डिलिव्हरी होईल.

Leave a Comment