मयंक अग्रवालची डबल सेंच्युरी, दुसऱ्या दिवसाखरे भारताच्या 6 बाद 493 धावा


नवी दिल्ली – इंदोरच्या होळकर स्टेडियम सुरु असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारताने 114 षटकांत 6 गडी गमावून 493 धावा करत बांग्लादेशविरुद्ध 343 धावांची आघाडी मिळवली. सलामीवीर मयंक अग्रवाल 330 चेंडूत 243 धावा करून बाद झाला. वीरेंद्र सेहवागच्या शैलीत मयंकने 303 चेंडूत एका षटकारासह दुसरे द्विशतक पूर्ण केले. बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात आला आणि त्यानंतर भारताने फलंदाजी करताना केवळ एक गडी गमावले होतो. दुसऱ्या दिवशी संघाने 5 गडी गमावले. बांगलादेशकडून अबू जायद याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. इबादत हुसेन आणि मेहिदी हसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

चेतेश्वर पुजारा याने दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा फक्त 68 चेंडूत आपल्या कसोटी कारकीर्दीतील 23 वे अर्धशतक ठोकले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराने मयंकच्या साथीने चांगली भागीदारी केली, पण पुजारा लगेच चौकार लगावत 54 धावांवर माघारी परतला. जायदने पुजाराला सैफ हसनच्या हाती कॅच आऊट केले. त्याच्यानंतर कर्णधार विराट कोहली जाएदच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने मयंकला चाली साथ दिली. दोघांनी 190 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. रहाणेने अर्धशतक केले, पण शतक पूर्ण करण्याआधी 86 धावांवर झेलबाद झाला.

त्यानंतर मयंकने टेस्ट करिअरमधील दुसरे द्विशतक केले. टेस्टमधील चांगला फॉर्म कायम ठेवत मयंकने सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. यापूर्वी मयंकने दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात पहिले दुहेरी शतक केले होते. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत बांग्लादेश संघाला अवघ्या 150 धावांवर ऑल आऊट केले. बांग्लादेशचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.

Leave a Comment