कसोटीत चांगल्या गोलंदाजांची कमतरता; पुर्वीसारखी लढत पाहायला मिळत नाही, सचिनची खंत

कसोटी क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना फलंदाज आणि गोलंदाजांमधील लढत पाहायची असते. ते आता बघायला मिळत नाही. चांगले गोलंदाज खूप कमी राहल्यामुळे कसोटी क्रिकेटचे आकर्षण कमी होत चालले असल्याचे मत, भारताचा माजी क्रिकेटपूट सचिन तेंडुलकरने व्यक्ते केले आहे. सचिनला क्रिकेटमध्ये पदार्पण करून 30 वर्ष झाली आहेत, यानिमित्ताने त्याने सध्या खेळात झालेल्या बदलांविषयी मत व्यक्त केले. सचिनने 15 नोव्हेंबर 1989 ला पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

सचिनने सुनील गावस्कर-एंडी रॉबर्ट्स, डेनिस-लिली-इम्रान खान, त्यानंतर स्वतः – वसीम अक्रम आणि ग्लेन मॅकग्रा यांच्यातील जुगलबंदीविषयी भाष्य केले.  सचिन म्हणाला की, मैदानावर दिसणारी ही लढत आता संपली आहे. वेगवान गोलंदाजांची गुणवत्ता निश्चितच अधिक सुधरू शकते. कसोटीचा स्तर खूपच खाली गेला असून, निश्चितच ही चांगली गोष्ट नाही. हा स्तर उंचवण्यासाठी खालील स्तरावर काम करण्याची गरज आहे.

सचिन पुढे म्हणाला की, मला वाटते की जर कोणी आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले तर तो खेळाडू टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निश्चितच भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो. मात्र आयपीएलच्या आधारावर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यासाठी निवड केल्यावर त्यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत.

यावेळी बोलताना सचिनने जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला. यावेळी त्याने शेन वॉर्न, डेल स्टेन आणि पर्थवरील शतक याच्या देखील आठवणी सांगितल्या.

Leave a Comment