सत्ते पे सत्ताच्या रिमेकमधून ऋतिकचा काढता पाय


निर्माता रोहित शेट्टीच्या चित्रपटापासून ऋतिक रोशन दूर झाला असून रोहित शेट्टी ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक बनवणार आहे. पण ऋतिकने चित्रपट अशावेळी सोडला ज्यावेळी निर्माते चित्रपटाच्या अन्य कलाकारांच्या नावाची घोषणा करण्याची तयारी करत होते. स्क्रिप्टमधील बदलामुळे ऋतिकने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भातील वृत्त पिंकव्हिला या मनोरंजन संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार वाद तेव्हा निर्माण झाला, जेव्हा रोहित शेट्टी, अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी अभिनीत सत्ते पे सत्ताचे हक्क विकत घेण्यात अयशस्वी झाला. चित्रपटाचे निर्माते रोमू एन. सिप्पी यांच्या कुटुंबियांनी हक्काच्या बदल्यात 2-3 कोटी रुपये मागितले होते. जे शेट्टी आणि त्याच्या टीमला खूप जास्त वाटले. नंतर त्याने पुढे बातचीत करण्याऐवजी 1954 मध्ये आलेला हॉलिवूड चित्रपट ‘सेव्हवन ब्राइड्स फॉर सेव्हन ब्रदर्स’चे राइट्स खरेदी केले, ज्यावरून ‘सत्ते पे सत्ता’ ची कथा घेण्यात आली होती. फराह खानच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या या रिमेकचे नाव आता ‘सेव्हन’ असेल.

रिपोर्टमध्ये पुढे लिहिले गेले आहे की, ऋतिकला इंग्रजी चित्रपटातून घेतलेल्या कथेचा रिमेक करण्यात अजिबात रस नसल्यामुळे फराह खान आणि रोहित शेट्टीला त्याने सांगितले आहे की, ते इतर कोणत्याही अभिनेत्याला त्यांच्या प्रोजेक्टसाठी कास्ट करू शकतात. नव्या कलाकाराचा शोध घ्यायला दोघांनी सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा अजूनही प्रोजेक्टचा भाग आहे.

Leave a Comment