आधार कार्डला घरबसल्या असे करा लॉक-अनलॉक

आधार कार्डचा वापर आज सिमकार्ड खरेदीपासून ते बँकेत खाते उघड्यापर्यंत सर्वच ठिकाणी होतो. मात्र आधार कार्डचा चुकीचा वापर झाल्याच्या देखील घटना मागील काही काळात वाढल्या आहेत. या समस्येपासून सूटका मिळवण्यासाठी यूआयडीएआयने लोकांना आधार लॉक अथवा अनलॉकची सुविधा दिली आहे. याद्वारे तुम्ही घरी बसल्या बसल्या काही सेंकदात आधार कार्ड लॉक करू शकता.

(Source)

आधार कार्ड लॉक करण्यासाठी सर्वात प्रथम आधारची अधिकृत वेबसाईट https://www.uidai.gov.in/ जा. येथे डाव्या बाजूला तुम्हाला माय आधार असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

(Source)

यानंतर तुमच्या समोर अनेक पर्याय येतील. त्यातील खालच्या बाजूला असलेल्या आधार लॉक आणि अनलॉक या पर्यायावर क्लिक करा.

(Source)

त्यानंतर तुमच्या समोरील फॉर्मवर नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि पिनकोड भरा.

(Source)

त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून तुम्ही आधार लॉक करू शकता.

(Source)

जर तुम्हाला आधार अनलॉक करायचे असेल तर तुम्ही व्हर्च्युअल आयडी किंवा सुरक्षा कोड टाकून अनलॉक करू शकता.

Leave a Comment