आता गुगल मॅप्स देणार स्थानिक भाषेत परदेशी स्थळांची माहिती

गुगलने आपल्या मॅप्ससाठी नवीन अपडेट आणले आहे. या नवीन अपडेटमध्ये कंपनीने मॅप्समध्ये भाषांतराचे फीचर जोडले आहे. याच्या मदतीने गुगल मॅप्स प्रवाशांना परदेशी ठिकाणांची नावे स्थानिक भाषेत बोलून सांगेल.

याशिवाय मॅप्स स्थानिक भाषेत त्या जागेची माहिती देखील देईल. यासाठी कंपनी गुगल मॅप्समध्ये अँड्राईड आणि आयफोनसाठी नवीन अपडेट देणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, गुगल मॅप्सवर कोणत्याही जागेवर टॅप केल्यानंतर स्पीकर सुरू होईल व त्या जागेबद्दल संपुर्ण माहिती देईल.

अधिक माहितासाठी मॅप्समध्ये गुगल ट्रांसलेट लिंक करण्यात आलेले आहे. याशिवाय फोनमध्ये देण्यात आलेले टेक्स्ट-टू-स्पीच टेक्नोलॉजी आपोआपच तुमच्या फोनमधील भाषेला डिटेक्ट करेल आणि त्याच भाषेत तुम्हाला माहिती देईल. काही दिवसांपुर्वीच गुगलने मॅप्ससाठी इनकॉग्निटो मोड फीचर लागू केले आहे.

Leave a Comment