गेल्या दोन दिवसांपासून आधारच्या नियमांबद्दल सुरु असलेली चर्चा निव्वळ अफवा


नवी दिल्ली : बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्डच्या केवायसी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भात इतर काही बदल केले नसल्याचे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आधार कार्डचा पत्ता बदलण्यासाठी नियम सोपे करण्यात आल्याचे गेल्या दोन दिवसांपासून म्हटले जात होते. अर्थ मंत्रालयाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मनी लाँड्रिंगला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या आदेशानंतर आधारच्या नियमावरून गोंधळ उडाला होता.

गुरुवारी मंत्रालयाने सांगितले की, अशा लोकांसाठी आधारच्या केवायसीचा वापर सोपा करण्यात आला आहे जे कामानिमित्त किंवा इतर काही कारणाने एका दुसऱ्या जागी स्थलांतर करतात. आधार कार्डवर यामध्ये घरचा पत्ता बदलण्यासाठीच्या प्रक्रियेत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत.

आधार कार्डवर घराचा पत्ता बदलण्यासाठी नाही तर फक्त बँकेत खाते उघडण्यासाठी आधार केवायसीसंबंधी नियम बदलला आहे. एखादी व्यक्ती जर कामानिमित्त त्याच्या घरापासून दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा केवायसीची गरज नव्या बँकेत खाते उघडताना किंवा बँकेची शाखा बदलण्यासह इतर गोष्टींसाठी पडते. आधार कार्डवर तेव्हा घराचा पत्ता कायम ठेवत नव्या पत्त्याची माहिती स्वयंघोषणा पत्राद्वारे देता येते. यामुळे खाते उघडणे लोकांना सोपे जाते.

याआधी तुम्हाला आधारमध्ये तुमची माहिती अपडेट करता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बुधवारी समोर आलेल्या माहितीनुसार असे म्हटले जात होते की तुम्हाला आधारचा पत्ता सहज बदलता येईल. पण अशा प्रकारचा नियम नसल्याचे सांगत अर्थ मंत्रालयानं निर्माण झालेला गोंधळ दूर केला. सध्या तुम्ही काही कारणाने आधार कार्डवर असलेल्या पत्त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी असाल तर स्वंयघोषणापत्राद्वारे दुसरा पत्ता देता येतो.

Leave a Comment