टी-20 विश्वचषक स्पर्धेत दिसणार या हॉट पॉपस्टारचा जलवा


पुढच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यात महिला आणि पुरुष संघाचे टी-20 सामने खेळवले जाणार आहे. दरम्यान, हॉट पॉप स्टार कॅटी पेरीची या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे. कॅटी 8 ऑगस्ट 2020मध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गाताना दिसणार आहे.

मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने अंतिम सामन्यात रेकॉर्ड ब्रेक दर्शक उपस्थित असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सामिल होणार असल्याची घोषणा कॅटीने आपल्या इन्स्टाग्रामवरून केली.


8 मार्च 2020मध्ये मेलबर्नमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित करू या, असे सांगत कॅटीने यावेळी चाहत्यांना आवाहन केले आहे. 35 वर्षीय कॅटी आयसीसीच्या या स्पर्धेत अंतिम सामन्याच्या आधी आणि नंतर परफॉर्म करणार आहे.

आयसीसीच्या वतीने अशी अपेक्षा केली जात आहे की यावेळी रेकॉर्ड ब्रेक दर्शक एमसीजी मैदानावर उपस्थित राहू शकतात. याआधी 1999च्या महिला फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये 90 हजार 185 दर्शक उपस्थित होते. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात पुढच्या वर्षी 2020मध्ये 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुरुष संघांचा टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे.

Leave a Comment