प्लास्टिक बाटल्यांच्या तब्बल 2 लाख झाकणांपासून तयार केली गांधीजींची कलाकृती

मध्य प्रदेशमधील देवास येथील कलाकार आनंद परमार आणि त्यांच्या 12 सहकार्यांनी कुशाभाऊ ठाकरे स्टेडियममध्ये प्लास्टिक बाटल्यांच्या 2 लाख झाकणांपासून महात्मा गांधीजींची कलाकृती तयार केली आहे.

या कलाकृतीद्वारे महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने प्लास्टिक बंदीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही कलाकृती एक मोजेक आर्ट आहे. या कलाकृतीला बनविण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागला.

कलाकारांनी दावा केला आहे की, जगभरात कोठेही प्लास्टिक बाटल्यांच्या झाकणांद्वारे गांधीजींची एवढी मोठी पोट्रेट तयार करण्यात आलेले नाही. हे पोट्रेट 1500 वर्गफूटात पसरलेले आहे. याला बनविण्यासाठी 6 महिन्यांची तयारी करावी लागली.

Leave a Comment