आपल्या विंटर कलेक्शनमधून चाचा चौधरीच्या आठवणींना उजाळा देणार अनुष्का


आपल्या क्‍लोदिंग ब्रँडमध्ये यावेळी पॉप्युलर कॉमिक कॅरेक्टर चाचा चौधरीला अनुष्‍का शर्मा इनकॉरपोरेट करणार आहे. विशेषतः या थंडीमध्ये विंटर कलेक्‍शंसमधून ती आज ही डेव्हलपमेंट अनाउंस करणार आहे.

अनुष्का म्हणते, चाचा चौधरीचे कॉमिक मी शाळेत असताना वाचायचे. प्रत्येक दिवशी एखादे प्रकरण सोडवणारे चाचा चौधरी आणि त्यांचा सहयोगी साबू यांच्या जगात हरवून जाणे मला आजही आठवते. 90 च्या दशकातील ही आठवण मी परत आणू इच्छिते आणि ते फॅशन कल्चरद्वारे पॉप कल्चरच्या पद्धतीने सादर करू इच्छिते.

अनुष्काने पुढे सांगितले, चाचा चौधरीच कम्प्युटरच्या आधी आपले भारतीय हेरगिर होते. सुईपेक्षाही धारदार आणि कम्युटरपेक्षाही वेगवान ज्याचा मेंदू होता. मी हे कलेक्शन त्यांच्या प्रतिभेला महत्व देण्यासाठीच करू इच्छिते. 90 च्या दशकात हे कॉमिक्स आणि असे नायक भारतातील प्रत्येक मुलाच्या जीवनाचा एक आवश्यक भाग होते आणि आपण हे जगासमोर सादर करून त्या काळातील ताजेपणा आनंद परत आणले पाहिजे. अनुष्का म्हणाली, मी सपेंडीनंतर माझे क्‍लोदिंग ब्रँड फॅमिलीमध्ये चाचा चौधरीचे स्वागत करण्यासाठी खूप उत्साहित आहे.

Leave a Comment