चक्क हवेतील कार्बन डायोऑक्साइडपासून या कंपनीने तयार केला व्होडका

अमेरिकेची स्टार्टअप कंपनी एअर को. ने हवेपासून जगातील पहिला कार्बन नेगेटिव्ह व्होडका तयार केला आहे. कंपनी दावा केला आहे की, याला हवेमधील कार्बन डायोऑक्साइड सोलर पॉवर मशीनद्वारे एथेनॉलमध्ये बदलण्यात आले. कंपनीचे सह-संस्थापक ग्रेगरी कॉन्सटेनिन यांच्यानुसार, व्होडकाच्या प्रत्येक बाटलीत 0.4 किलो कार्बन डायोऑक्साइडचा वापर करण्यात आला आहे.

कंपनीनुसार, याची चव इतर सर्वसाधारण व्होडकापेक्षा वेगळी आहे. सर्वसाधारणपणे व्होडका गहू  व इतर पदार्थांपासून बनवला जातो. मात्र हा व्होडाका वेगळ्या पद्धतीने बनविण्यात आलेला आहे.

कंपनीनुसार, सोलर पॉवर मशीन हवेतून कार्बन डायोऑक्साइड घेऊन त्याला कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये विभागते. दोन्ही तत्वांना मेटलद्वारे पाण्यामध्ये मिसळून व्होडका तयार केला जातो. हा व्होडका पुर्णपणे शुद्ध असल्याचा दावा देखील कंपनीने केला आहे.

एअर को. कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये नाविन्यपणासाठी प्रसिद्ध आहे. ही कंपनी न्युयॉर्कमधील मोजक्याच बार आणि हॉटेलमध्ये आपले उत्पादन सप्लाय करते. कार्बन नेगेटिव्हच्या एका बाटलीची किंमत 4,700 रुपये आहे.

कंपनीच्या सह-संस्थापकांनुसार, ते ग्रीन हाऊस सारख्या उत्सर्जनाला कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय घराची सफाई आणि रुम फ्रेशनरला देखील कार्बन डायोऑक्साइडद्वारे बनविण्याची योजना आहे.

 

Leave a Comment