या गायकाने 3 उकडलेल्या अंड्यांसाठी मोजले 1672 रुपये

काही दिवसांपुर्वी अभिनेता राहुल बोसला एका हॉटेलने 2 केळ्यांसाठी 442 रुपये आकारले होते. या प्रकरणात त्या हॉटेलला दंड देखील झाला होता. असाच काहीसा प्रकार आता संगीतकार आणि गायक शेखर रवजियानी याच्याबरोबर घडला आहे. शेखरला 3 उकडलेल्या अंड्यासाठी तब्बल 1672 रुपये मोजावे लागले आहेत.

शेखरने बिल शेअर करत लिहिले की, तीन अंड्यांसाठी तब्बल 1672 रुपये ? गरजे पेक्षा अधिकच महाग जेवण होते. शेखरने शेअर केलेल्या बिलानुसार, एवढे भलेमोठे बिल आकारणारे हॉटल अहमदाबादमधील हयात रिजेंसी असल्याचे समजत आहे.

https://twitter.com/YourRadiantDoc_/status/1194992015856914433

शेखरच्या बिलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स शेखरला हातगाडीवर अंडी खाण्याचे देखील सल्ला देत आहेत.

काही दिवसांपुर्वीच अभिनेता राहुल बोसला एका हॉटेलने 2 केळ्यांसाठी 442 रुपये आकारले होते. या प्रकरणात चंदीगडमधील फाइव्ह स्टार हॉटेलला 25 हजारांचा दंड झाला होता.

Leave a Comment