रेल्वेतील चहा, नाश्ता आणि जेवण झाले महाग

आता रेल्वेमध्ये प्रवास करताना चहा, नाश्ता आणि जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाने पर्यटन आणि खाद्य विभागाच्या सुचनांवरून एक सर्क्युलर जारी केले आहे. यानुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. या रेल्वेमध्ये तिकिट घेतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसे द्यावे लागतात. दुसऱ्या रेल्वेंमधील प्रवाशांना देखील महागाईचा फटका बसणार आहे.

(Source)

राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेससाठी लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार, सेंकड एसी प्रवाशांना चहासाठी 10 च्या जागी 20 रुपये द्यावे लागणार आहेत. तर स्लीपर क्लासच्या प्रवाशांना 15 रुपये द्यावे लागतील. दुरांतोच्या स्लीपर क्लासमध्ये नाश्ता आधी 80 रुपयांना मिळत होता, तो आता 120 रुपयांना मिळेल. तर सायंकाळच्या चहाची किंमत 20 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आलेली आहे.

(Source)

तिकिट सिस्टममध्ये नवीन मेन्यू आणि दरे 15 दिवसात अपडेट होतील. तर 120 दिवसानंतर नवीन दर लागू होतील. राजधानी एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये जेवणासाठी 145 च्या जागी 245 रुपये द्यावे लागतील.

नवीन दर हे केवळ प्रिमियम रेल्वे प्रवाशांनाच नाहीतर सर्वसाधारण प्रवाशांसाठी देखील आहेत. रेग्युलर मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमध्ये शाकाहारी जेवण 80 रुपयांना मिळेल, जे सध्या 50 रुपयांना आहे. रेल्वे कॅटेरिंग आणि टुरिझ्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) रेल्वे प्रवाशांना एग्स बिर्यानी 90 रुपयांना आणि चिकन बिर्यानी 110 रुपयांना देण्यात येईल. रेग्युलर रेल्वेमध्ये 130 रुपयांमध्ये चिकन करी दिली जाईल. 2014 नंतर प्रथमच दरांमध्ये बदल करण्यता आलेले आहेत.

Leave a Comment