तुम्हाला देखील आले असेल चुकीचे ई-चलान तर अशी करा तक्रार

वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल झाल्यापासून, चलानमध्ये वाढ झाली आहे. सरकारने यासाठी ई-चलान देखील सुरू केले आहे. मात्र काही लोकांना चुकीच ई-चलान पाठवले जाते. अशावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वेळे देखील खूप वाया जातो. जर तुम्हाच्या देखील चलानमध्ये काही गडबड झाली असेल अथवा तुम्हाला चुकीचे चलान आले असेल, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी वेबसाईट आहे.

उत्तर प्रदेश ट्रॅफिक पोलिसांची एक वेबसाईट आहे. येथे लोक चुकीच्या चलानाची तक्रार नोंदवू शकतात. 72 तासात लोकांच्या तक्रारीचे निवारण केले जाते.

चुकीच्या चलानाची तक्रार नोंदवण्यासाठी http://trafficpolicenoida.in (प्रत्येक राज्याची वेगळी वेबसाइट आहे) लिंकवर जा. येथे जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी रजिस्टर न्यूवर क्लिक करावे लागेल. पेज उघडल्यावर त्यात तुमचे नाव, ई-मेल आणि मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करा.

हे केल्यानंतर तुम्हाला कार अथवा बाईकचा रजिस्ट्रेशन नंबर, लायसन्स नंबर आणि चलान नंबर भरावा लागेल. तुम्ही चलानच्या फोटोसोबत देखील तक्रार करू शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर तक्रार नंबर येईल. वाहतुक पोलिस 72 तासांच्या आत तुमच्या तक्रारीचे निवारण करून त्याची माहिती वेबसाइट्सवर टाकेल.

Leave a Comment