ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्रात बुडू लागले आहे हे पाण्यावर तरंगणारे शहर

जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे. इटलीती पाण्यावर तरंगणारे सुंदर शहर व्हेनिस पाण्यात डुबू लागले आहे. या शहरात 53 वर्षानंतर सर्वात मोठा पुर आला आहे. याआधी 1966 मध्ये असा भयानक पुर आला होता.

13 नोव्हेंबरला उंच लाटांमुळे शहरात पाणी भरले. शहरातील ऐतिहासिक इमारती देखील पाण्याखाली गेल्या आहेत. जगप्रसिद्ध ग्रिटी पॅलेसमधील अनेक बहुमुल्य वस्तूंना पाण्यामुळे नुकसान झाले आहे. कोस्टगार्डची टीम अतिरिक्त बोटी आणि वॉटर रुग्णिवाहिकेद्वारे बचाव कार्य पार पाडत आहे.

(Source)

इटलीमध्ये मागील वर्षी खराब वातावरणामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला होता. तर यावर्षी 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. महापौरांनी पुर्ण व्हेनिस शहराला आपत्तकालीन क्षेत्र घोषित केले आहे.

 

(Source)

इटलीच्या या सुंदर शहरात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मात्र यंदा पुरामुळे प्रशासन त्यांना परत पाठवत आहे.  महापौरांनी ट्विट करून सरकारडे मदत देखील मागितली आहे. तसेच, या घटनेचा हवामान बदल कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

 

(Source)

हॉटेल, मोठमोठ्या बिल्डिंग्स, लोकांचे सामान सर्व काही पाण्याखाली गेले आहे.1984 मध्ये व्हेनिसला पुरापासून वाचवण्यासाठी योजना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व योजना घोटाळ्याच्या शिकार झाल्या. आजपर्यंत एकही योजना पुर्ण झाली नाही.

Leave a Comment