आता बच्चन पांडेमध्ये अक्षयसोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार कृती सेनॉन


कृती सेनॉन आणि अक्षय कुमार यांच्या जोडीला अलिकडेच रिलीज झालेल्या ‘हाउसफुल 4’ चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.


कृतीची निवड खिलाडी कुमारच्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटासाठी करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकत्र ‘हाउसफुल 4’चीही हिट जोडी पाहायला मिळेल. आपल्या द्विटरवर एक पोस्ट करत कृतीने या बातमीला दुजोरा देताना स्क्रिनशॉट शेअर केला आहे. येत्या फेब्रुवारीत ‘बच्चन पांडे’च्या शूटींगला सुरू होईल आणि हा चित्रपट २०२० च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

Leave a Comment