स्मार्टफोन पाठोपाठ आता भारतीय कार बाजारावर कब्जा करण्याच्या तयारीत चीन

एकीकडे भारतातील ऑटो सेक्टर क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. कार कंपन्या मोठमोठ्या ऑफर्सद्वारे गाड्यांची विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चीनच्या ऑटोमोबाईल कंपन्या भारतीय बाजारात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अर्धाडझन चीनी वाहन निर्माता कंपनी भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सांगण्यात येत आहे की पुढील 3 ते 5 वर्षात चीनी कंपन्या देशाच्या ऑटो सेक्टरमध्ये जवळपास 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

MG Motors, BYD, Great Wall Motors, Changan आणि Beiqi Foton या कंपन्या भारतात गुंतवणूक वाढवण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नाही तर त्यांचे वेंडर्स पार्टनर देखील यामध्ये भागीदारी घेतील, याशिवाय Geely आणि Chery Scout या कंपन्या भारतीय बाजाराकडे मोठी संधी म्हणून पाहत आहेत. एमजी हेक्टरच्या मालकीचे SIAC लवकरच भारतात इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. एमजी हेक्टरने या आधीच देशात 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय ग्रेट वॉल मोटर्स देखील भारतात आपली एसयूव्ही आणणार आहे. कंपनीने गुरूग्राम येथे ऑफिस देखील सुरू केले आहे.

याशिवाय टाटा मोटर्सने लग्झरी कार कंपनी जॅग्युआर लँज रोव्हरमधील भागीदारी कमी करण्याचा निर्णय घेतला असून, चीनी कंपनी Geely सोबत चर्चा सुरू आहे. यासोबतच चीनची हेवी ट्रक बनवणारी कंपनी नॅशनल हेवी ड्यूटी ट्रक ग्रुप कंपनी मॅन ट्रक्सने मुंबईची एकर कंपनीसोबत ट्रक बनवण्यासंदर्भात करार केला आहे. तर Beiqi Foton या चीनी कंपनीने पीएमएलसोबतच इलेक्ट्रिक बस बनविण्याचा करार केला आहे. फोटोनने चाकण जवळ जमीन देखील खरेदी केली आहे.

याआधी चीनी कंपन्यांनी सॅमसंगसोबतच इतर भारतीय स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर दिली आहे. आज भारतीय स्मार्टफोन बाजारावर 60 टक्के चीनच्या कंपन्यांचा हिस्सा आहे.

Leave a Comment