या कारची विक्री बंद करणार ह्युंडाई

देशातील दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी ह्युंडाई लवकरच आपली सब-4 मीटर कॉम्पॅक्ट सेडान कार ह्युंडाई Xcent बंद करणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

ह्युंडाईची ही कॉम्पॅक्ट सेडान लाँचिंगपासूनच या सेग्मेंटमध्ये मागे पडत गेली. एवढेच नाही तर फेसलिफ्टनंतर देखील कारच्या विक्रीमध्ये खास वाढ झाली नाही. मारूती डिझायर आणि होंडा अमेझसमोर एक्सेंट मागे पडत गेली. तर कंपनी आता नवीन एक्सेंट लाँच करण्याच्या तयारीत आहे.

रिपोर्टनुसार, नेक्स्ट जनरेशन ह्युंडाई एक्सेंट लवकरच बाजारात लाँच होणार आहे. मात्र त्याचे नाव बदलणार आहे. कंपनी एक्सेंटला Hyundai Aura नावाने लाँच करणार आहे. कंपनी या कारची टॅक्सीची इमेज बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याचे नाव ऑरा ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

सांगण्यात येत आहे. नेक्सट जनरेशन ऑराला बीएस 6 इंजिनसोबत लाँच केले जाऊ शकते. यासोबतच 2020 मध्ये लागू होणाऱ्या पेडेस्टेरियन प्रोटेक्सन नॉर्म्स देखील या कारमध्ये लागू करू शकते. नवीन ह्युंडाई ऑराचा लूक हा ग्रँड आय10 NIOS मिळता जुळता असेल.

Leave a Comment