तब्बल 10,010mAh बॅटरी असणारा स्मार्टफोन लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी हायसेंसने आपला नवीन स्मार्टफोन किंगकाँग 6 ला चीनमध्ये लाँच केले आहे. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यात तब्बल 10,010mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. दिसायला हा फोन सर्वसाधारण फोनप्रमाणेच आहे, मात्र या डिव्हाईसमध्ये लावण्यात आलेल्या एका खास एक्सेसरीजद्वारे फोनची बॅटरी वाढवण्यात आलेली आहे.

किंगकाँग 6 मध्ये 5510 एमएएचची इन-बिल्ट बॅटरी आहे. मात्र सोबतच 4500एमएएचचा बीस्पोक बॅटरी केस देखील मिळतो. ज्याच्या मदतीने फोनमध्ये एकूण 10010 एमएएचची बॅटरी पॉवर मिळते. फोनच्या रिअर पॅनेलवर कनेक्टर्स देण्यात आलेले आहेत. ज्याच्या मदतीने फोनमध्ये बीस्पोक बॅटरी केसला फीट करण्यात येते. युजर्स आपल्या गरजेनुसार याचा वापर करू शकतात.

मोठ्या बॅटरीशिवाय यामध्ये 3 रिअर कॅमेरे देखील देण्यात आलेल आहेत. यामध्ये 13 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा असून, दोन 2-2 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये वॉटर-ड्रॉप नॉच स्क्रीन पॅनेल मिळेल. यामध्ये 6.52 इंच डिस्प्ले देण्यात आला असून, ज्याचे रिजॉल्यूशन 720+ आहे. सिक्युरिटीसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल.

हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, यात 4 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज हे व्हेरिएंट आहेत. सध्या फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. कंपनी लवकरच फोनची किंमत आणि विक्रीची तारखेविषयी माहिती देणार आहे.

 

Leave a Comment