ही दिग्गज टेक कंपनी लाँच करणार क्रेडिट कार्डच्या आकाराचा कॉम्प्युटर

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एवढे नवनवीन प्रोडक्ट्स बाजारात आले आहेत की, ज्यामुळे आपले आयुष्य एकदम सोपे झाले आहे. आता दिग्गज टेक कंपनी गुगल देखील क्रेडिट कार्डच्या आकाराचा कॉम्प्युटर लाँच करणार आहे. याचे नाव टिंकर बोर्ड असे असेल.

गुगलने सिंगल बोर्ड कॉम्प्युटरसाठी स्मार्टफोन कंपनी आसुसशी भागीदारी केली आहे. या कॉम्प्युटरला खास आर्टिफिसियल इंटेलिजेंस (एआय) अॅप्सच्या संचालनासाठी बनविण्यात आले आहे.

आसुस या कॉम्प्युटर्सला जापानमध्ये होणाऱ्या आयओटी टेक्नोलॉजी कॉन्फ्रेंसमध्ये सादर करणार आहे. या डिव्हाईसला दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात येणार आहे. ज्याचे नाव टिंकर ऐज टी आणि टिंकर ऐज आर आहे. फीचर्सबद्दल सांगायचे तर कंपनीने टिंकर ऐज आरमध्ये एनएक्स्पी i.MX8M आणि ऐज टीपीयू चिप दिली आहे. तर टिंकर ऐज टीमध्ये Rockchip RK3399 प्रोसेसर आणि 4K मशीन लर्निंगसाठी एनपीयू दिले आहे.

युजर्सला या कॉम्प्युटरमध्ये इनपुट-आउटपूटसोबत एक्टिव कूलिंग गीगाबिट ईथरनेट आणि यूएसबी 3.0 सपोर्ट मिळेल. याशिवाय हे दोन्ही कॉम्प्युटर्स कमी पॉवरचा वापर करतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे हे कॉम्प्युटर्स कॅमेऱ्याद्वारे रूममध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो काढू शकतात. या डिव्हाईसच्या कॅमेऱ्यात वाइड अँगल लेंस सेंसर आहे. ज्याचे व्यू 187 डिग्री आहे.

आसुसचे म्हणणे आहे की, या कॉम्प्युटरद्वारे एनॉमली डिटेक्शन सॉल्यूशन तयार करण्यात आलेले आहे. ज्याद्वारे फोटोची त्वरित ओळख पटेल. कंपनीचे म्हणणे आहे की, या डिव्हाईसचा कॅमेरा फोटोसोबतच चुकीच्या क्रियेची देखील नॉटिफिकेशन पाठवेल.

Leave a Comment