भारतात लाँच झाली फुल चार्जिंगमध्ये 150 किमी धावणारी ‘इलेक्ट्रिक सुपर बाईक’

देशात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटरसोबत इलेक्ट्रिक बाईक्सवर देखील काम करत आहे. भारतातील पहिली इलेक्ट्रिक बाईक Revolt RV 400 नंतर आणखी एक कंपनी इलेक्ट्रिक सुपर बाईक घेऊन येत आहे. बंगळुरूची कंपनी Ultraviolette ऑटोमोबाईलने हायपरफॉर्मेंस एफ77 इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा चार्ज केल्यावर ही बाईक 150 किमी धावते.

या बाईकमधील बॅटरीचा परफॉर्मेंस 200 ते 250 सीसी बाईक्स एवढा आहे. या बाईकची किंमत 3 ते 3.5 लाख रूपयांपर्यंत आहे. याची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. कंपनीने दावा केला आहे की, आतापर्यंत या बाईकसाठी 100 पेक्षा अधिक बुकिंग्स आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ बंगळुरूमध्ये या बाईकची विक्री होईल.

(Source)

या बाईकमध्ये ट्रॅकिंग, ओव्हर द एअर अपग्रेड्स, राइट टेलीमेटिक्स आणि रिमोट डायग्नोस्टिक्स सारखे फीचर्स मिळतील. सोबतच बाईकमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, अनेक रायडिंग मोड्स आणि फोन अॅप बेस्ड कनेक्टिव्हिटी मिळेल.

एफ77 मध्ये मॅट ब्लॅक चेसिस आणि स्लेट ग्रे रंगाची एल्युमिनियम रिम तर मॅट ब्लॅक रंगाचे क्रॅश गार्ड मिळतील. डॅशबोर्डमध्ये अल्ट्रा हाय ब्राइटनेस ऑटोमोटिव्ह टीएफटी एलसीडी मिळेल. बाईकमध्ये इको, सपोर्ट आणि इनसेन हे तीन मोड मिळतील. बाईकमध्ये फास्ट चार्जर, क्रोम चार्जिंग पॉड, वाइजर आणि क्रॅश गार्ड मिळेल. यामध्ये ब्लूटूथ, एनएफसीसारखे फीचर्स देखील मिळतील.

(source)

बाईकमध्ये 25 kWh ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आलेली आहे. ही मोटर 2250 आरपीएमवर 33.5 एचपीची पॉवर आणि 450 एनएमचा टॉर्क देते. तर 2.89 सेंकदात ताशी 0 ते 60 किमीचा आणि 7.35 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग पकडते. बाईकची टॉप स्पीड ताशी 147 किमी आहे. यामध्ये 4.2 kWh ची तीन लीथियम ऑयन बॅटरी आहे. जी साधारण चार्जिंगवर 5 तासात चार्ज होते. तर फास्ट चार्जिंगमध्ये दीड तासात चार्ज होते.

(Source)

बाईकमध्ये 4 जी सोबतच 3जी आणि 2जी ई-सिम कनेक्टिव्हिटी देखील मिळेल. याच्या मोबाईल अॅपमध्ये एंबियंट लाईट सेंसर, अडप्टिव डॅशबोर्ड ब्राइटनेस, टेंपरेचर, वोल्टेज, एक्टिव ट्रेकिंग, शॉक सेंसर्स, क्रेश डिटेक्शन इमर्जेंसी कॉन्टॅक्ट अलर्ट सारखे फीचर्स मिळतील. ही बाईक बनवणारी कंपनी अल्ट्रावॉयलेट ऑटोमोटिवमध्ये टिव्हीएसने गुंतवणूक केलेली आहे.

 

Leave a Comment