अ‍ॅपलने लाँच केले 2 लाख रुपयांचे 16 इंचाचे मॅकबुक प्रो

अ‍ॅपलने आपला बहुप्रतिक्षित 16 इंच मॅकबुक प्रो लाँच केला आहे. नवीन मॅकबुक प्रो मध्ये मोठ्या डिस्प्लेसोबत शानदार मॅजिक कीबोर्ड देण्यात आला आहे. 16 इंच मॅकबुक प्रो ला कंपनीच्या अधिकृत वेबसाइट्सवरून ऑर्डर करता येईल. नवीन लॅपटॉपला खासकरून डेव्हलपर्स, फोटोग्राफर्स, फिल्ममेकर आणि म्यूझिक प्रोड्यूसर यांना लक्षात घेऊन बाजारात आणले आहे.

(Source)

अ‍ॅपलच्या 16 इंच मॅकबुक प्रो ची सुरूवाती किंमत 1,99,900 रुपये असून, पुढील आठवड्यापासून जगभरातील अ‍ॅपलच्या अधिकृत स्टोरमध्ये विक्री सुरू होईल. शानदार अनुभवासाठी कंपनीने या 16 इंच रेटिना डिस्प्ले दिला आहे. याशिवाय यामध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर, 8 जीबीपर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळेल. या नवीन मॅकबुकमध्ये कंपनीने मॅजिक कीबोर्ड दिला आहे. कंपनीने यामध्ये 64 जीबीपर्यंत रॅम आणि 8 टीबी पर्यंत मेमरी दिली आहे. यामध्ये 100 वॉट ऑवरची बॅटरी मिळेल.

नवीन मॅकबुक प्रोमध्ये इंटेलचा 9 व्या जनरेशनचे प्रोसेसर देण्यात आले आहे. ग्राफिक्ससाठी यामध्ये एएमडी रेडियन प्रो 5000M ग्राफिक्स मिळेल. यामध्ये सहा स्पीकर्स देण्यात आलेले आहेत. यामध्ये अ‍ॅपलचे टचबार, टच आयडी सेंसर, फोर्स टच ट्रॅकपॅड आणि अ‍ॅपल टी-2 सिक्युरिटी चिप मिळेल.

(Source)

कनेक्टिव्हिटी यामध्ये चार थंडरबोल्ट 3 पोर्ट मिळेल, ज्यामध्ये यूएसबी 3.1 जनरेशन-2 सपोर्ट मिळेल. याचा स्पीड 10Gbps असेल. याशिवाय 3.5 एमएमचा हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5 आणि 720 पिक्सल फेसटाइम कॅमेरा मिळेल.

Leave a Comment