‘जागतिक बॉडीबिल्डिंग चॅम्पियशनशीप’मध्ये सैन्यातील जवानाने जिंकले सुवर्ण पदक

भारतीय लष्करातील जवान अनुज कुमार तेलियानने11 व्या जागतिक बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकत देशाच्या सन्मानात भर घातली आहे. दक्षिण कोरिया येथील जेजू द्वीप येथे ही स्पर्धा पार पडली. अनुजने 100+ किलोग्रॅम गटात सुवर्ण पदक जिंकले.

अनुजने बाहुबलीचे टायटल साँग देखील बॅकस्कोर म्हणून चालवले. अनुज मद्रास इंजिनिअर ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. 2010 मध्ये तो भारतीय लष्करात सहभागी झाला. याआधी देखील त्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले आहे. त्याने 2018 मध्ये सर्विस चॅम्पियनशीपमध्ये देखील पदक जिंकले होते.

अनुज आपले वर्कआउट व्हिडीओ देखील इंस्टाग्रामवर पोस्ट करतो. 2018 मध्ये त्याने मिस्टर इंडिया खिताब आपल्या नावावर केला होता. देशाची सेवा करण्याबरोबरच अनुज सारखे जवान देशाची पदके देखील आणत आहेत.

Leave a Comment