अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये सुंदर होईल तुमची त्वचा


परिणिती चोप्राच्या मेकओव्हरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिची सतेज, नितळ कांती आणि तिचा सुडौल बांधा सर्वांनाच आश्चर्यचकित करतो आहे. आपले वजन घटविण्यासाठी परिणितीने आपल्या आहाराची काळजी तर घेतलीच, शिवाय शारीरिक व्यायाम ही काटेकोरपणे सांभाळला. तिच्या नितळ त्वचेचे कारण आहे तिने अंगिकारलेले खास स्कीन केयर रुटीन. यासाठी परिणिती दिवसाकाठी केवळ पंधरा मिनिटे इतकाच वेळ देते. हे स्कीन केयर रुटीन आपण कसे आत्मसात करू शकता याबद्दल थोडेसे..

आपला चेहरा धुण्यासाठी चांगल्या प्रतीच्या फेस वॉश चा वापर करावा. सगळ्यांचीच त्वचा एकसारखी नसते. कुणाची त्वचा तेलकट तर कुणाची कोरडी त्वचा असते. आपल्या त्वचाप्रकाराला मानवेल असा फेस वॉश निवडावा. फक्त चेहरा न धुता प्रत्येक वेळेस चेहरा, गळा आणि मानही धुवावी. यामुळे आपल्या त्वचेवर जमा झालेले धुळीचे कण, तसेच त्वचेवरचा तेलकटपणा निघून जाण्यास मदत मिळेल.

चेहेरा धुऊन झाल्यानंतर चांगल्या प्रतीच्या मॉईश्चराईजर चा वापर करावा. या मुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि त्वचेला आर्द्रता मिळते. परिणिती आपल्या त्वचेकरिता अॅलो व्हेरा वापरणे पसंत करते. दिवसातून अनेक वेळा ताज्या अॅलोव्हेराचा गर परिणिती मॉईश्चराईजर म्हणून वापरते.

आपल्या ओठांची काळजी घेण्या करिता चांगल्या प्रतीच्या लिप बाम चा वापर करणे आवश्यक आहे. लिप बामच्या वापरामुळे ओठ कोरडे पडत नाहीत. परिणिती देखील अनेक प्रकारचे लिप बाम स्वतःजवळ ठेवते आणि दिवसभरात वरचेवर त्याचा वापरही करते.

त्वचा उत्तम राहावी या साठी आहार, व्यायाम यांच्या बरोबर झोपेच्या सवयी नियमित असणे हे ही आवश्यक आहे. कामाची कितीही धावपळ असली किंवा कुठे बाहेर शूटिंग करत असताना देखील परिणिती या बाबतीतले नियम अगदी आवर्जून पाळते. रात्रीची आठ तासांची झोप ही मिळायलाच हवी याबद्दल परिणिती आग्रही असते. त्याचबरोबर भरपूर पाणी पिणे ही परिणिती ची सवय आहे. तिच्या या सवयीमुळे तिची त्वचा सतेज आणि नितळ राहण्यास मदत मिळते.

या सगळ्या गोष्टी करत असताना अजून काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यावी. आपण मेकअप वापरात असल्यास रात्री झोपण्यापूर्वी मेकअप अवश्य साफ करावा. यासाठी खोबरेल तेल वापरलास उत्तम. रात्री झोपण्यास कितीही उशीर झाला तरीही आळस न करता मेकअप साफ करावा. आपण वापरत असलेल्या प्रसाधनामध्ये किती ही नाही म्हटले तरी थोडीफार केमिकल्स असतातच. त्यामुळे मेकअप साफ न केल्यास डोळे खाजणे, त्वचेवर पुरळ येणे अश्या गोष्टी घडू शकतात. प्रसाधने शक्यतो कमी वापरावीत किंवा वापरत असल्यास त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment