पुणे : हॉटेलमध्ये ऑनलाईन टेबल बुकिंगच्या नादात महिलेला 99 हजारांचा गंडा

पुण्यातील एका 29 वर्षीय महिलेला ऑनलाईन टेबल बुकिंगच्या नादात 99 हजारांचा फटका बसला आहे. ऑनलाईन मिळालेल्या नंबरद्वारे महिलेने टेबल बुक करण्यासाठी जंगली महाराज रोडवरील एका हॉटेलमध्ये फोन केला.

महिलेचा फोन उचललेल्या इसमाने आपण हॉटेलचे मॅनेजर असल्याचे सांगितले व टेबल बुक करण्यासाठी 25 रुपये भरावे लागतील असे सांगितले. यासाठी त्याने महिलेला एक लिंक देखील पाठवली. मात्र लिंकवर क्लिक केल्यानंतर काही मिनिटातच त्या महिलेचे खाते रिकामे झाले होते.

पर्वती पायथा येथे राहणाऱ्या महिलेन दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, 3 नोव्हेंबरला महिलेला आपल्या कुटूंबाला जेवणासाठी न्यायचे होते. यासाठी तिने ऑनलाईन नंबर शोधले.

इसमाने महिलेच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये एक प्रोग्राम डाऊनलोड झाला. त्यानंतर महिलेने यूपीआय अकाऊंट उघडले व त्यात पिनही टाकला. त्यामुळे क्षणात महिलेचे खाते रिकामे झाले.

 

Leave a Comment