असे सोडवा तुमचे सिगारेटचे व्यसन…


व्यसनांचे घातक परिणाम वेळोवेळी समोर आले असले तरी वाढत्या व्यसनाधिनतेला म्हणावा तसा आळा बसू शकलेला नाही. सध्याच्या आधुनिक विचारसरणीच्या तरूणांमध्ये वाढती व्यसनाधिनता ही मोठी चिंतेची बाब ठरत आहे. सध्याच्या आधुनिक युगात तर तरूणाईच्या जगण्याच्या कल्पना बदलत चालल्या आहेत. त्यात व्यसनाधिन तरूणांचं वाढतं प्रमाण अधिक चिंताजनक आहे. सिगारेट किंवा तंबाखूचं व्यसन असणारे अनेक तरूण आपल्याला आजुबाजुला पहायला मिळतात. अलिकडे तर तरूणींही धुम्रपान करू लागल्या आहेत. व्यसनमुक्‍तीसाठी तीव्र इच्छाशक्‍तीची आवश्‍यकता असते. ती असेल तर धूम्रपानाचं व्यसन सहजरित्या कसं सोडता येईल. धूम्रपानामुळे पोट, यकृत, गळा, फुफ्फुस यांचे कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. असं असलं तरी सिगारेट किंवा इतर कोणतंही व्यसन सोडण्यासाठी तीव्र इच्छाशक्‍तीची गरज असते.

काही घरगुती उपायांनीही सिगारेटचं व्यसन सुटू शकतं. पाहूया कोणते आहेत ते उपाय

* सिगारेटऐवजी शुगर फ्री च्युईंग गम चघळण्याचा मार्गही अवलंबता येईल. मुख्यत्वे च्युईंग गममुळे सिगारेटची आठवण येणार नाही

* धूम्रपान करावंसं वाटलं तर मध चाटणं हाही उपाय सहज अवलंबता येण्यासारखा आहे.

* धूम्रपान करावंसं वाटलं की काळं मीठ आणि लिंबाचा रस मिसळलेलं आलं चघळा. यातील सल्फरमुळे धूम्रपानची इच्छा कमी होते.

* खारावलेले आवळे सुकवून घ्यावेत. सिगारेटची तल्लफ आली की आवळ्याचा तुकडा चघळावा. यातील क जीवनसत्त्वामुळे निकोटिनची इच्छा कमी होते.

* धूम्रपान करावंसं वाटलं की दालचिनीची पूड खावी किंवा तुकडा चघळावा. दालचिनीमुळे धूम्रपानाची इच्छाच राहत नाही.

* सिगारेट ओढण्याची इच्छा होऊ नये, यासाठी आहारात ओट्‌सचा समावेश करा.

* भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातला ओलावा टिकून राहतो. शरीर आतून स्वच्छ होतं आणि निकोटिनच्या घातक परिणामांपासून बचाव होतो.

* लाल मिरची तसंच मिरी यात कॅप्सिसिन नावाचा घटक असतो. यामुळे निकोटिनची इच्छा कमी होते. म्हणूनच आहारात लाल मिरची आणि काळ्या मिरीचा समावेश अवश्‍य करायला हवा.

* बेकिंग सोड्यामुळे शरीरातल्या आम्लाचं प्रमाण नियंत्रणात राहतं. दिवसभरात दोन ते तीन वेळा पाण्यात बेकिंग सोडा घालून प्यावा. यामुळे धूम्रपान करण्याची इच्छा कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment