दिशा पटनीच्या दारी अवतरली नवी कोरी रेंज रोव्हर


नेहमीच अलिशान आणि महागड्या गाड्यांचे बॉलिवूड कलाकार हे शौकिन असल्याचे आपण अनेकदा पाहिले आणि ऐकले देखील असेल. त्यातच बॉलिवूड अभिनेता इम्रान हश्मी, लोकप्रिय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीने काही दिवसांपूर्वी Lamborghini ही महागडी कार खरेदी केली होती. आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव या महागड्या यादीमध्ये नोंदवण्यात आले आहे. लोकप्रिय अभिनेत्री दिशा पटनीने नुकतीच नवी महागडी अशी कार घेतली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर तिने कारसोबतचा फोटो शेअर केला आहे.


रेंज रोव्हर स्पोर्ट एसयुव्ही ही कार दिशाने खरेदी केली आहे. एक कोटी तीस लाख रुपये या कारची किंमत आहे. ही कार पॅट्रोलवर चालणारी असून रेंज रोव्हर स्पोर्ट एसयुव्ही ही कार प्रती तास २०१ किमीचा पल्ला पार करते. तसेच ७.३ सेकंदमध्ये १०० किमीचा वेग ही कार पकडते.

रेंज रोवर कार बॉलिवूड कलाकारांमधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, संजय दत्त, सलमान खान, आलिया भट्ट अशा अनेक कलाकारांकडे असल्याचे पाहायला मिळते. हे कलाकार बऱ्याच वेळा कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. या कलाकारांमध्ये आता दिशा पटणीचा देखील समावेश झाला आहे.

Leave a Comment