पर्यावरणासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी रूमालावर छापली मुलाच्या लग्नाची पत्रिका

आपल्या देशात लग्न समारंभात अफाट पैसा खर्च केला जातो. सजावट, जेवणापासून ते लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेपर्यंत सर्वच गोष्टीवर पैसे खर्च केले जातात. मात्र लग्नानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन तामिळनाडूच्या एका उपजिल्हाधिकारीने आपल्या मुलाच्या लग्नात एक वेगळे कार्ड छापले आहे, ज्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

सर्वसाधारणपणे कागदांवर आणि प्लास्टिकच्या आकर्षक पत्रिकेद्वारे निमंत्रण दिले जाते. कागद हे झाडापासून तयार होतात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. यामुळे तामिळनाडूमधील कांचीपूरम येथील उपजिल्हाधिकारी सेल्वमती वेंकटेश यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका रूमालावर छापली आहे.

एस. वेंकटेश यांच्या मुलाच्या लग्नात पत्रिकेपासून ते गिफ्ट्सपर्यंत सर्वच गोष्टीत पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे. एस. वेंकटेश सांगतात की, लग्नाच्या पत्रिका महाग आहेत आणि लग्न झाल्यावर दोन-तीन दिवसातच त्या कचऱ्यात फेकून दिल्या जातात. हे मला आवडत नाही.

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून कागदांऐवजी कापडावर निमंत्रण छापण्याचा निर्णय घेतला. दोन-तीनदा धुतल्यानंतर यावरची प्रिटिंग निघून जाईल. त्यामुळे रूमाल पुन्हा वापरता येईल.

या रूमाल कार्डसोबत एक पाउच देखील देण्यात येत आहे. या पाउचचा वापर महिला ज्वेलरी ठेवण्यासाठी करू शकतात. याशिवाय लग्नात प्लास्टिकचे कप आणि टिश्यू पेपरच्या वापरावर देखील बंदी घातली आहे. त्याजागी स्टीलचे ग्लास आणि सुती टॉवेलचा वापर करण्यात येणार आहे.

पत्रिकेसोबत पाहुण्यांना 2000 बियाणे देखील देण्यात आली आहेत. यामध्ये कडुलिंब, भाज्या अशा अनेक प्रकारची बियाणे होते. पत्रिकेवर बियाणे लावण्याचे देखील आवाहन करण्यात आले होते.

Leave a Comment