नीता अंबानींची न्यूयॉर्कमधील 150 वर्ष जुन्या म्युझियमच्या बोर्डात निवड

रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्टच्या बोर्डमध्ये निवड झाली आहे. त्या म्यूझियमच्या पहिल्या भारतीय मानद ट्रस्टी आहेत. म्यूझियमचे चेअरमन डॅनियल ब्रॉडस्कीने याबाबत माहिती दिली. नीता अंबानी मागील अनेक वर्षांपासून मेट्रोपॉलिटन म्यूझियम प्रदर्शनाला मदत करत आहेत. हे अमेरिकेचे सर्वात मोठे आर्ट म्यूझियम आहे.

नीता अंबानी 2017 मध्ये म्हणाल्या होत्या की, मेट्रोपॉलिटन म्यूझियमद्वारे भारतीय कलेला प्रतिष्ठित संस्थेच्या प्रदर्शनात संधी मिळाली आणि आम्ही कलेच्या क्षेत्रात काम सुरू ठेवण्यास प्रोत्साहित झालो.

मेट्रोपॉलिटन म्यूझियम हे 149 वर्ष जुने आहे. येथे जगभरातील 5000 वर्ष जुन्या कलाकृती आहेत. दरवर्षी लाखो लोक या म्यूझियमला भेट देतात. यामध्ये अनेक अब्जाधीश आणि सेलेब्रेटी देखील असतात. या म्यूझियमचा 2018 चा रेवेन्यू 385.3 मिलियन डॉलर होते.

Leave a Comment