आता टिकटॉकला टक्कर देणार इंस्टाग्रामचे ‘रिल्स’

इंस्टाग्रामने आपल्या युजर्सला शॉर्ट व्हिडीओचा आंनद घेता यावा यासाठी टिकटॉक सारखे फीचर्स लाँच केले आहे. या फीचरला इंस्टाग्राम रिल्स (Reels) असे नाव देण्यात आलेले आहे. अँड्राईड आणि ओएस दोन्ही युजर्ससाठी हे फीचर्स लाँच करण्यात आलले आहे. मात्र सध्या हे फीचर ब्राझील पुरतेच मर्यादित आहे.

टिकटॉकप्रमाणेच युजर्स यात 15 सेंकदांचे लिप सिंक व्हिडीओ, म्यूझिक व्हिडीओ तयार करू शकतील व इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करता येईल. युजर्सला स्टोरीजमध्ये बुमरँग, सुपरझूम आणि लाईव्ह या फीचरसोबतच रिल्स हे फीचर मिळेल.

(Source)

फेसबुकने या आधी शॉर्ट व्हिडीओसाठी लासो हे वेगळे अप लाँच केले होते. मात्र इंस्टाग्रामने दुसरे वेगळे अॅप आणण्या ऐवजी आपल्या युजर्ससाठी थेट नवीन फीचर आणले आहे. यामुळे हे फीचर इंस्टाग्रामच्या कोट्यावधी युजर्सला वापरता येईल. इंस्टाग्रामचे हे नवीन फीचर आता टिकटॉकला टक्कर देईल.

 

Leave a Comment