आपल्या किडनींचे आरोग्य कसे सांभाळाल


आपल्या किडनी त्यांच्या कामातून कधीही सुट्टी घेत नाहीत. त्यांचे काम अहोरात्र चालूच असते. आपल्या शरीरातील अनावश्यक द्रव्ये फिल्टर करुन शरीराबाहेर टाकण्यास मदत करणे हा आपल्या किडनींचा मुख्य धर्म. आपल्या शरीरामध्ये कुठल्या द्रव्यांची आवश्यकता आहे किंवा कुठल्या नाही, हे ठरविण्याचे काम किडनी करीत असतात. या कामामध्ये त्यांना किती तरी वेळा ‘ ओवर टाईम ‘ देखील करावा लागतो, पण तरी ही आपल्या किडनी कधीही विश्रांती न घेता आपले काम करतच राहतात. त्यामुळे आपल्या किडनी ना ‘ टॉप कंडीशन ‘ मध्ये ठेवण्याची जबाबदारी आपण उचलायला हवी. कारण किडनी उत्तम राहिल्या तर आपले आरोग्यही उत्तम राहील. त्यासाठी काही सवयींचा अवलंब आपण करावयास हवा.

आपल्या आहारामध्ये असलेले प्रोसेस्ड फूड आपण कमी करायला हवे. वेफर्स, कोल्ड्रिंक, तसेच इतर फास्ट फूड कमी मात्रेमध्ये खावे. तसेच आपल्या जेवणामध्ये मिठाची मात्रा माफक ठेवावी. मिठाच्या अति सेवनामुळे उच्च रक्तदाब होण्याचा धोका संभवतो, ज्यामुळे पर्यायाने किडनी खराब होऊ शकतात. मिठाच्या अति सेवनामुळे किडनी स्टोन होण्याचा ही धोका उद्भवू शकतो.

दिवसाकाठी कमीतकमी आठ ते दहा ग्लास पाणी आपण प्यायला हवे. हे पाणी आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य तर ठेवतेच, शिवाय ते किडनी साठीही अतिशय फायदेकारक आहे. या पाण्यामुळे किडनी द्वारे शरीरातील अनावश्यक द्रव्ये सहजी बाहेर टाकली जातात. त्यामुळे दिवसाला तीन लिटर पाणी जरूर प्यावे.

अति मद्यपानाची सवय आपल्या किडनी ना घातक ठरू शकते. मद्यपानामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डीहायड्रेशन चा धोका संभवू शकतो. त्याचबरोबर मद्यपानामुळे किडनीच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊन शरीरातील अनावश्यक द्रव्ये बाहेर टाकण्यात किडनी ना अडचण होऊ शकते. त्यामुळे मद्यापान करायचेच झाले तर त्या बरोबरच पाणी ही भरपूर पिणे आवश्यक आहे.

आहारातील योग्य नियंत्रणाबरोबरच योग्य व्यायाम घेणे ही आवश्यक आहे. व्यायामाच्या अभावी वजन वाढणे, उच्च रक्तदाब यांसारखे विकार होण्याची शक्यता असते. या विकारांचा किडनी वर ही प्रभाव पडून किडनी आपले काम व्यवस्थित करू शकत नाहीत. त्यामुळे चालणे, पळणे, पोहणे यांसारख्या व्यायामांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब जरूर करावा.

आपल्या आहारामध्ये गोड पदार्थांचे सेवन माफक असावे. गोड पदार्थांऐवजी फळे खाण्याची सवय लावून घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment