फ्रांस : समुद्रात 1000 किलो कोकीन, प्रशासनाने बीच केला बंद

फ्रान्सच्या एटलांटिक तटावर रहस्यमयीरित्या कोकीन समुद्रातवाहून गेल्याने, अखेर प्रशासनाने बीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोंबरपासून प्रशासनाला येथे आतापर्यंत 1000 किलो कोकीन सापडले आहे.

प्रशासनाला उत्तरेकडील भागात कोकीन असलेले 5 किलोचे पार्सल सापडले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तटावर दररोज 100 किलोचा लॉट येत आहे. अधिकाऱ्यांनी समुद्रात देखील काही पाकिटे सापडली.

दररोज शेकडो किलो कोकीन कसे वाहून येत आहे, याचा 100 अधिकारी तपास घेत आहेत.

काही दिवसांपुर्वीच एका 17 वर्षीय युवकाला 5 किलो कोकीनसोबत पकडण्यात आले होते. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन या भागात शोध घेत आहेत. यासाठी हेलिकॉप्टरचा देखील वापर करण्यात येत आहे. आतापर्यंत 1010 किलो कोकीन सापडले आहे. आजुबाजूचे इतर बीच देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अधिकारी तपास करत आहेत.

 

Leave a Comment