फडणवीस झाले ‘महाराष्ट्र सेवक’


source
मुंबई – राज्यातील सत्ता संघर्ष कायम असल्यामुळे राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन संघर्ष निर्माण झाल्यामुळेच निवडणुकीपूर्वीची युती निकालानंतर संपुष्टात आली. मुख्यमंत्री पदाची शिवसेनेची मागणी मान्य न करता भाजपने विरोधी पक्षात बसण्याची भुमिका घेतली. त्याआधी विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपला असून देवेंद्र फडणवीस यांनी यादिवशी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

source
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना कारभार पाहण्यास सांगितले. पण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्रीपदही फडणवीस यांच्याकडे राहिले नसल्यामुळे त्यांनी आपले सोशल मीडियावरचे अकाऊंटही रिनेम केले आहे. ट्विटवरचे CM Devendra Fadnavis हे अकाऊंट रिनेम करत आता फक्त Devendra Fadnavis असे केले आहे. तसेच त्यांनी स्वत:ला ‘महाराष्ट्र सेवक’ म्हणून संबोधित केले आहे. त्यांनी ट्विटरचे कव्हर पेजही बदलून ‘धन्यवाद महाराष्ट्र’ असे म्हणत राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. दरम्यान, सीएमओ महाराष्ट्र (CMO Maharashtra) या ट्विटर अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलण्यात आला असून या अकाऊंटचा कव्हर फोटो मात्र देवेंद्र फडणवीस यांचाच ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment