फेसबुकची बहुप्रतिक्षित पेमेंट सेवा लाँच

फेसबुकने आपली बहुप्रतिक्षित पेमेंट सेवा फेसबुक पे अखेर सुरू केले आहे. या नवीन सेवेमुळे फेसबुक, मेसेंजर, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपद्वारे पेमेंट करणे सोपे होईल. सध्या ही सेवा अमेरिकेत सुरू करण्यात आली असून, या वर्षीच्या अखेरपर्यंत भारतात ही सेवा सुरू होईल.

फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर युजर्सला वस्तूंची विक्री करता येते. फेसबुक हे मार्केटप्लेससाठी आहे तर इंस्टाग्राम शॉपिंग फीचर्ससाठी आहे. फेसबुक पेद्वारे आता युजर्सला शॉपिंग, रक्कम डोनेट करणे आणि मित्रांना पैसे पाठवणे सोपे होणार आहे.

यामध्ये युजर्सच्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. युजर्सला स्वतःच्या सोयीनुसार, पेमेंट पद्धत निवडू शकतात. याशिवाय प्रत्येक वेळेस पेमेंटची माहिती टाकण्याची गरज नाही. याशिवाय युजर्स पेमेंट हिस्ट्री पाहू शकतील, पेमेंटची पद्धत देखील बदलू शकतील.

फेसबुक पे चा वापर करण्यासाठी  –

जर तुम्ही अमेरिकेत असाल, तर अशाप्रकारे तुम्ही फेसबुक पेचा वापर करू शकता –

  1. मोबाईल अथवा वेबसाईट्सवर जाऊन फेसबुक पे मध्ये सेटिंग्स पर्याय निवडा.
  2. त्यानंतर पेमेंटची पद्धत निवडा.
  3. त्यानंतर कधीही व्यवहार करताना फेसबुक पे ची निवड करा.

याशिवाय फेसबुक युजर्स या सेवेद्वारे गेम खरेदी करू शकतात. मेसेंजरद्वारे पेमेंट करू शकतील, फेसबुक पेजसाठी पेमेंट करता येईल. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत व्हॉट्सअॅप पे ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा यूपीआय बेस्ड असेल.

Leave a Comment