जाणून घ्या अ‍ॅपल टिव्ही, अ‍ॅपल टिव्ही+ आणि अ‍ॅपल टिव्ही 4K मधील फरक

अ‍ॅपलने काही दिवसांपुर्वीच भारतात अ‍ॅपल टिव्ही+ सर्विस भारतात सुरू केली आहे. महिन्याला 99 रुपये भरून ही स्बस्क्रिप्शनबेस सर्विस तुम्ही घेऊ शकता. याशिवाय कंपनीने म्हटले आहे की, अ‍ॅपल टिव्ही + चा सपोर्ट अ‍ॅमेझॉन फायर टिव्हीमध्ये देण्यात येणार आहे.

जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी केला तर तुम्हाला अ‍ॅपल टिव्ही+ सर्विस 1 वर्ष मोफत मिळेल. अ‍ॅपल टिव्ही+, अ‍ॅपल टिव्ही आणि टिव्ही टिव्ही 4 के या सर्विस वेगवेगळ्या आहेत. अनेक जण यात गोंधून जातता. अ‍ॅपल टिव्ही+ ही एक सर्विस, तर अ‍ॅपल टिव्ही एक अ‍ॅप असून, अ‍ॅपल टिव्ही टिव्ही 4के एक हार्डवेअर सर्विस आहे.

अ‍ॅपल टिव्ही + – 

अ‍ॅपल टिव्ही + विषयी सांगायचे तर कंपनीने काही दिवसांपुर्वीच ही सेवा लाँच केली आहे. यावर कंपनी ओरिजनल शोज आणि सीरिज लाँच करणार आहे. कंपनी ओरिजनल कंटेट तयार करत आहे. जे केवळ अ‍ॅपल टिव्ही+ वरच पाहता येतील. सध्या यावर Morning Show, See, Dicinson सारखे शो तुम्ही पाहू शकता.

अ‍ॅपल टिव्ही+ ला तुम्ही अ‍ॅपल टिव्हीद्वारे एक्सेस करू शकता. अ‍ॅपल टिव्ही हे एक फ्री अ‍ॅप आहे, जे तुम्ही आयफोन आणि आयपॅडमध्ये वापरू शकता. अ‍ॅमेझॉन फायर स्टिक्स युजर्स देखील हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करू शकता.

अ‍ॅपल टिव्ही 4K –

अ‍ॅपल टिव्ही 4K हे एक हार्डवेअर आहे, जे अ‍ॅपल टिव्ही ओएसवर चालते. याला तुम्ही एलईडी टिव्हीसोबत कनेक्ट करू शकता. अ‍ॅपल टिव्ही 4K सोबत एक रिमोट देखील मिळतो. अ‍ॅपल टिव्ही 4K एक स्ट्रीमबॉक्स आहे. अ‍ॅपल टिव्ही 4K मुळे तुम्ही नेटफ्लिक्स, एचबीओ, हॉटस्टार अ‍ॅमेझॉन प्राईम आणि हुलू एकाच ठिकाणी पाहू शकता. यामध्ये सिरी सपोर्ट देखील मिळेल.

अ‍ॅपल टिव्ही 4K मध्ये मल्टी युजर सपोर्ट मिळेल. ज्याला तुम्ही कंट्रोल सेंट्रलद्वारे एक्सेस करू शकता. लहान मुलांसाठी वेगळे अकाऊंट देखील बनवू शकता. अ‍ॅपल टिव्ही 4K द्वारे, तुम्ही आयफोन, आयपॅड आणि मॅक एचडी टिव्हीवर प्रोजेक्ट करू शकता.

अ‍ॅपल टिव्ही अ‍ॅप –

अ‍ॅपल टिव्ही हे एक अ‍ॅप आहे. जेथे तुम्हाला अ‍ॅपल टिव्ही+ सर्विस मिळेल. अ‍ॅपल टिव्ही अ‍ॅपवर तुम्हाला हजारो चित्रपट बघायला मिळतील. तुम्ही हे चित्रपट खरेदी देखील करू शकता. तुम्ही आयफोन आणि आयपॅडमध्ये अ‍ॅपल टिव्ही अ‍ॅप फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता.

तुमच्यासाठी काय चांगले आहे ?

कंपनीने अ‍ॅपल टिव्ही+ चे स्बस्क्रिप्शन खूप कमी ठेवले आहे. यामध्ये तुम्ही ऑरिजनल शोज आणि सीरिज बघू शकता. हे शोज तुम्ही टिव्हीसोबतच आयफोन, आयमॅक आणि आयपॅडवर देखील बघू शकता. अ‍ॅपल टिव्ही 4K ची किंमत जवळपास 17,000 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही अ‍ॅपल टिव्ही+ पासून सुरू करू शकता.

Leave a Comment