शाओमी सर्वांना मागे टाकत स्मार्टफोन ब्रँडमध्ये अव्वल स्थानी

भारतीय स्मार्टफोन बाजारात 2019 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये विक्रमी 46.6 मिलियन पेक्षा जास्त युनिट्स शिप करण्यात आलेले आहेत. शाओमी यामध्ये सर्वात मोठी कंपनी ठरली असून, शाओमीने एकूण 1.26 कोटी युनिट्स शिपमेंट केले आहेत. टॉप-5 मध्ये सॅमसंगच्या शिपमेंटमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. हे आकडे आंतरराष्ट्रीय डेटा कार्पोरेशनच्या (आयडीसी) मोबाईल फोन ट्रॅकर रिपोर्टमध्ये समोर आले आहेत.

आकड्यांनुसार, 1.26 कोटी युनिट्सच्या शिपमेंटसोबत चीनची स्मार्टफोन किंमत शाओमी पहिल्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शाओमीच्या शिपमेंटमध्ये 8.5 टक्के वाढ झाली आहे. शाओमीचे रेडमी 7ए आणि रेडमी नोट 7 प्रो सर्वाधिक शिप केलेले मॉडेल्स आहेत. दुसऱ्या नंबरवर राहिलेल्या दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने 99 लाख युनिट्स शिप केले आहेत. सॅमसंगच्या वार्षिक शिपमेंटमध्ये 8.5 टक्क्यांनी घट आली आहे.

15 ते 35 हजार रूपयांच्या मिड रेंज सेंग्मेंटने 18.9 टक्के बाजारावर कब्जा केलेला आहे. वनप्लस 7, रेडमी के20 प्रो आणि व्हिवो व्ही15 प्रो सारखे फोन ग्राहकांची पंसती ठरले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 15 ते 21 हजारांमधील फोन आहेत. यामध्ये गॅलेक्सी ए50, रेडमी नोट 7 प्रो आणि व्हिवो झेड1 प्रो सारख्या फोनचा समावेश आहे.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मसवरील आकर्षक कॅशबॅक ऑफर्स आणि बायबॅक ऑफर्ससोबत नो कॉस्ट ईएमआय सारख्या योजनेमुळे शिपमेंटचा आकडा 45.4 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Leave a Comment