व्हॉट्सअॅपकडून लवकरच अँड्राईड मोबाईलसाठी मिळणार ही नवी सुविधा


लवकरच अँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्सअॅपमध्ये डार्क मोड सुरू होणार असून व्हॉट्सअॅपकडून सध्या यावर काम सुरू आहे. याच्या काही आयकॉन्सवर काम केले जात आहे. सर्व अँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्सअॅप डार्क मोड ते पूर्ण झाल्यानंतर सुरू केले जाईल. पण नक्की कधी डार्क मोड रिलीज केले जाणार, याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या संदर्भातील ट्विट WABetaInfo ने केले आहे.

अँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्सअॅपकडून डार्क मोडवर गेल्या काही महिन्यांपासून काम केले जाते आहे. याबद्दल व्हॉट्सअॅपच्या गेल्या बिटा अपडेटमध्ये माहिती देताना डार्क मोड जवळपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. आयओएस अर्थात आयफोनमधील आपल्या अॅपसाठीही व्हॉट्सअॅपकडून डार्क मोड देण्यावर काम केले जात आहे. पण अँड्राईड मोबाईलमधील अॅपच्या तुलनेत आयफोनमधील व्हॉट्सअॅपच्या डार्क मोडवर जास्त काम करावे लागणार आहे. या मोबाईलमधील लेबल्स आणि पार्श्वभूमी या दोन्हीवर काम केले जाणार आहे. ते पूर्ण झाल्यावरच व्हॉट्सअॅपकडून आयफोनसाठीही डार्क मोड सुरू केले जाईल.

आधी बिटा वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपकडून नव्या सुविधा दिल्या जातात. त्यांचा प्रतिसाद बघून मगच कंपनीकडून सर्व वापरकर्त्यांसाठी नव्या सुविधा दिल्या जात असतात. सार्वजनिक बिटा वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपकडून अद्याप डार्क मोडची सुविधा देण्यात आलेली नाही.

Leave a Comment