खाशोगींच्या हत्येबाबत वक्तव्य केल्यानंतर उबेरच्या सीईओंचा माफीनामा

उबेरचे सीईओ दारा खोस्रोवशाही यांनी जमाल खाशोगी प्रकरणात माफी मागितली आहे. एका मुलाखतीमध्ये खोस्त्रोवशाही यांनी जमाल खाशोगी यांची हत्या ‘एक चूक’ असल्याचे म्हटले होते.

खोस्त्रोवशाही यांनी ट्विट केले की, जमाल खाशोगी यांच्याबरोबर जे झाले ते विसरण्यासारखे नाही. या घटनेला एक ‘चूक’ म्हणणे हे अयोग्य होते. भावनेच्या भरात ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, ते मी बोलून गेलो. आमच्या गुंतवणूकदारांना माझ्या मतांबद्दल माहिती आहे.

अमेरिकेचे वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्टमध्ये स्तंभलेखक असलेल्या जमाल खागोशी यांची 2 ऑक्टोंबर 2018 ला इस्तानबुलमधील सौदीच्या दूतावासात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सौदी प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्यावर देखील टीका झाली होती.

सौदी अरेबिया कंपनीमधील पाचवे सर्वात मोठे शेअर होल्डर्स आहे. ते म्हणाले की, मला वाटत सरकारने या संदर्भात चूक झाल्याचे म्हटले आहे. खोस्त्रोवशाही यांनी मार्च 2018 मध्ये उबेरच्या सेल्फ ड्रायव्हिंग व्हिकलद्वारे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच्याशी या घटनेची तुलना केली.

खोस्त्रोवशाही यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेत बराच गदारोळ उठला. अखेर टीकेनंतर त्यांना याबाबत माफी मागावी लागली.

 

Leave a Comment