डिसेंबरमध्ये लाँच होणार टाटाची ‘नेक्सॉन’ इलेक्ट्रिक एसयूव्ही

इलेक्ट्रिक वाहनांची वाट बघणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. लवकरच टाटा मोटर्स आपली लोकप्रिय सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सॉनचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे.

टाटा मोटर्सने सांगितले होते की, पुढील तीन महिन्यात कंपनी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे. त्याआधी पुढील महिन्यात 16 डिसेंबरला कारवरील पडदा हटवला जाईल.

(Source)

इलेक्ट्रिक नेक्सॉनच्या लूकबद्दल सांगायचे तर याचा लूक आताच्या टाटा नेक्सॉनप्रमाणेच आहे. यामध्ये फरक इलेक्ट्रिक व्हर्जनचे असेल. याच्या इंटेरियरमध्ये देखील कंपनी बदल करू शकते. याचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर सध्या बाजारात असलेल्या मॉडेलपेक्षा वेगळे असेल.

कंपनी आपल्या एलेक्ट्रिक नेक्सॉनमध्ये जिपट्रॉन ईव्ही टेक्नोलॉजी दिली आहे. जेणेकरून ड्रायव्हिंग करताना परफॉर्मेंस, कंफर्ट आणि अफोर्डेबिलिटी लक्षात येईल. कंपनी यात लिथियम – आयन बॅटरी देईल. या बॅटरी पॅकला आयपी67 रेटिंग मिळाली आहे. जिच्यावर पाणी आणि धुळीचा परिणाम होत नाही. बॅटरी पॅकमध्ये लिक्विड कूलिंग फीचर देखील आहे. जेणेकरून गरम तापमानात देखील चांगला परफॉर्मेंस मिळेल.

(Source)

लाँचिंगच्या आधी टाटा मोटर्स चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरवर काम करत आहे. सध्या 13 देशांमध्ये 85 चार्जर आहेत. जे वाढून 300 करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. याशिवाय फास्ट चार्जरद्वारे ही एसयूव्ही 60 मिनिटात 80 टक्के चार्ज होईल.

कंपनीने कारच्या बॅटरीला 10 लाख किमीपेक्षा अधिक टेस्ट केले आहे आणि कंपनी यावर 8 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे. नेक्सॉन ईव्हीमध्ये पर्मेनेंट मॅग्नेट एसी मोटर मिळेल. कंपनीचे म्हणणे आहे की, ही देखील एक कनेक्टेड कार असेल, ज्यात 30 पेक्षा अधिक स्मार्ट फीचर मिळतील. ज्यांना स्मार्टफोनच्या मदतीने एक्सेस करता येईल. या कारची किंमत 15 ते 17 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment