अखेर महाराष्ट्रात तिसऱ्यांदा लागू झाली राष्ट्रपती राजवट


नवी दिल्ली: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यामुळे महाराष्ट्रात अखेर आजपासून तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान राज्यात सत्तेचा दावा करण्यात भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यांनी तसे पत्रच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते. या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार आजपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

Leave a Comment