युनिव्हर्सिटीची आयडियाची कल्पना; परीक्षेचा तणाव दुर करण्यासाठी 30 मिनिटे झोपा थडग्यात

विद्यार्थ्यांच्या तणाव दूर करण्यासाठी नेदरलँडच्या एका युनिवर्सिटीने विचित्र अशी आयडिया शोधली आहे. निज्मेगेन शहरातील रेडबाउड युनिवर्सिटीतील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे की, जमीनत एक खड्डा खोदून तेथे एक थडगे बनवावे आणि यात मेडिटेशन करण्यासाठी झोपावे.

यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेचा ताण दूर करण्यासाठी मदत मिळेल. युनिवर्सिटीच्या या हटके कल्पनेची माहिती एका विद्यार्थ्यानेच स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हा अनुभव सांगितल्यावर समजली.

युनिवर्सिटीमध्ये बनविण्यात आलेले हे थडगे 30 मिनिटांपासून ते 3 तासांपर्यंत बूक करता येते. काही विद्यार्थ्यांनी तणाव दुर करण्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ही कल्पना लोकप्रिय झाली आहे. मात्र काही जणांनी याला विरोध देखील केला आहे.

 

 

Leave a Comment