आता एकाच सेटटॉप बॉक्सवर मिळू शकते वेगवेगळ्या कंपनीची सेवा

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया (ट्राय) लवकरच असे नियम लागू करणार आहे, ज्याअंतर्गत एकाच सेटटॉप बॉक्सवर टिव्ही चॅनेल ब्रॉडकास्ट करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची सेवा घेता येईल. ट्रायने डिजिटल टिव्ही ब्रॉडकास्टिंग सेवांसाठी सेटटॉप बॉक्स इंटर ऑपरेटबिलिटीला पत्र पाठवले आहे. यावर सर्वांच्या सुचना मागितली आहे.

ट्रायचे म्हणणे आहे की, एकाच सेटटॉप बॉक्सवर वेगवेगळ्या सेवा देणाऱ्या कंपन्यांची सेवा उपलब्ध नसल्याने पे-टिव्ही बाजारातील प्रतिस्पर्धा कमी होते. त्याचबरोबर टेक्नोलॉजी इनोव्हेशन, सेवेची गुणवत्ता सुधारणे आणि सेक्टरच्या विकासासाठी देखील अडचण आहे.

23 डिसेंबरपर्यंत ट्रायने यावर संबंधित पक्षांकडून सुचना मागवल्या आहेत. ट्रायने एप्रिल 2016 मध्ये यावर एक प्री कंसल्टेशन पेपर जारी केला होता. यानंतर ऑगस्ट 2017 मध्ये सोल्यूशन ऑर्किटेक्टरवर एक कंसल्टेशन नोट जारी केले होते.

Leave a Comment