जाणून घ्या जगातील सर्वाधिक विषारी सापांबद्दल, एकामुळे तर न चावता देखील होऊ शकतो मृत्यू

सापाचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो. कारण साप पृथ्वीवरील सर्वात खतरनाक जीवांपैकी एक आहेत. जगात सापांच्या 2500-3000 प्रजाती आहेत. मात्र यातील काही ठराविक साप खूपच धोकादायक आहे. भारतात विषारी सापाच्या ज्ञात प्रजाती 69 आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विषारी सापांबद्दल सांगणार आहोत. हे साप चावल्यास मृत्यू निश्चित आहे.

(Source)

सी स्नेक (समुद्री साप) –

समुद्री साप दक्षिण-पुर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. यांना जगातील सर्वात विषारी साप समजले जाते. या सापाच्या विषाचे काही थेंबच हजारो लोंकाच्या मृत्यूचे कारण ठरू शकते. असे असले तरी हे साप केवळ समुद्रातच आढळतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप कमी धोका असतो. मात्र मासे पकडताना काही मच्छिमार याचे शिकार होतात.

(Source)

इंनलँड तायपान –

हा जमिनीवर राहणारा साप आहे. जो खूपच विषारी आहे. याच्या एका बाइटमध्ये 1000 मिलिग्रॅम एवढे विष असते. जे एका क्षणात 100 जणांचा जीव घेऊ शकते. याचे विष कोब्र्याच्या तुलनेत 50 पट अधिक खतरनाक असते.

(Source)

इस्टर्न ब्राउन स्नेक –

हा साप ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. सांगण्यात येते की, या सापाच्या विषाचा 14000 वा हिस्साच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी पुरेसे आहे.

(Source)

फिलिपीनी कोब्रा –

तसे तर कोब्रा सापाच्या अधिकांश प्रजाती या विषारीच असतात. मात्र फिलिपीनी कोब्र्यात जेवढे विष असते, तेवढे कशातच नसते. या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्याला चावण्याच्या ऐवजी लांबूनच विष त्याच्यावर थुंकतो. याचे विष न्यूरो टॉक्सिक असते. जे सरळ श्वास आणि ह्रदयावर परिणाम करते.

(Source)

ब्लॅक माम्बा –

आफ्रिकेत आढळणारा ब्लॅक माम्बा जमिनीवरील सर्वात वेगवान साप आहे. जो ताशी 20 किमी वेगाने शिकारचा पाठलाग करतो. हा साप एखाद्यावर जेव्हा हल्ला करतो, त्यावेळी त्याचा 10-12 वेळा चावा घेतो आणि 400 मिलिग्रॅमपर्यंत विष त्याच्या शरीरात सोडतो.

 

Leave a Comment